अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-फ्रान्सची कार उत्पादक कंपनी Renault नं आपल्या 7 सीटर कार Renault Triber कारचं नवं व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लाँच केलं आहे.
त्यांनी यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं कारमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आणि अधिक आकर्षक ठरते.
जाणून घ्या किंमत … :- RXE व्हेरिअटची किंमत 5.30 लाख रुपये, तर टॉप मॉडेल RXZ ची किंमत 7.65 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
तर RXL च्या मॅन्युअल व्हेरिंअटची किंमत 5.99 लाख रुपये आणि ऑटोमॅटीक व्हेरिअंटची किंमत 6.50 लाख रुपये आहे.
याशिवाय RXT च्या मॅन्युअल मॉडेलसाठी 6.55 लाख आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंटसाठी 7.05 लाख रूपयात उपलब्ध केली जाणार आहे.
आकर्षक फीचर्स… :- फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर या MPV मध्ये प्रोजेक्टर हेडलँप, LED डे टाइम रनिंग लाईट्स, 8.0 इंचाचा ट्चस्क्रिन एन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे.
ही सिस्टम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोद्वारे कनेक्ट केली जाऊ शकते. तसंच तिन्ही रो मध्ये एसी वेंट्स, कुल्ड सेंटर बॉक्स, किलेस एंट्री,
पुश बटन स्टॉर्ट/स्टॉप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर,
पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच या कारमधील तिसऱ्या रोमधील सीट ही डिटॅचेबल आहे.
इंजिन क्षमता… :- या कारमध्ये कंपनीन 1.0 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन दिलं आहे.
जे 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सह येतं. हे इंजिन 70bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|