अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे,पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला.
त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे.
पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडच्या 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत भारताने रहाणे आणि शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला.
त्यानंतर आता इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य असून इंग्लंडने फलंदाजीला सुरुवात केली आहे. मात्र 67 धावांमध्ये त्यांचा निम्मा संघ पव्हेलियनमध्ये परतल्याने हा सामना आता भारताच्या बाजूने झुकला आहे.
विशेष म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रुटदेखील बाद झाल्याने इंग्लंडच्या या सामन्यातील आशा मावळू लागल्या आहेत इंग्लंडला विजयासाठी आता ६० षटकात २७२ धावांचे आव्हान आहे.
भारताने पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंतला (२२) गमावले. रॉबिन्सनने त्याला बाद केले. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते, पण जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी उभारली.
त्यानंतर शमीने मोईन अलीला षटकार ठोकत कसोटीतील दुसरे अर्धशतक साजरे केले. डाव घोषित झाला तेव्हा मोहम्मद शमीने ६ चौकार आणि एका षटकरासह नाबाद ५६ तर जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. वेगवान गोलंदाज मार्क वुडने इंग्लंडसाठी ३ बळी घेतले. तर रॉबिन्सन आणि मोईन अली यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम