India vs England : अजिंक्य व पुजारा जोडीनं मोठा विक्रम मोडला…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- इंग्लंडनं घेतलेल्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते.

अशात फॉर्मात नसलेली अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानावर होती. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून कोणी आशाही ठेवल्या नव्हत्या, परंतु टीम इंडियाच्या मदतीला ही अनुभवी जोडीच धावून आली.

अजिंक्य रहाणेनं १२५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना पुजारासह शतकी भागीदारीच्या दिशेनं वाटचाल केली. १५ ऑगस्टला अजिंक्यनं अर्धशतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा महेंद्रसिंग धोनीनंतरचा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

यासह अजिंक्य व पुजारा जोडीनं १९५९ सालचा मोठा विक्रम मोडला. पुजारा आणि रहाणे यांनी १७८ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. डिसेंबर २०१८नंतर पुजारा आणि रहाणे यांची ही पहिलीच अर्धशतकीय भागीदारी ठरली.

२०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ८७ धावांची भागीदारी केली होती. भारताच्या मागील २० वर्षांच्या कसोटी इतिहासात ही दुसरी सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी ठरली.

हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी मागच्या वर्षी सिडनी कसोटीत २४६ चेंडूंत ५० धावा जोडल्या होत्या. रहाणेला ३१ धावांवर असताना जॉनी बेअरस्टोनं झेल सोडून जीवदान दिले.. रहाणेनं १२५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe