Indian Coast Guard Recruitment: भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard Recruitment 2022) 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे.
याअंतर्गत नाविक (Navik) आणि मेकॅनिकलची (Mechanical) 300 हून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी 8 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
उमेदवार 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरू शकतील. इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दल joinindiancoastguard.cdac.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे नाविक आणि मेकॅनिकलच्या विविध पदांसाठी अर्ज करू शकतात.
रिक्त जागा तपशील
नाविक (General Duty): 225 पदे
नाविक (Domestic Branch): 40 पदे
मेकॅनिकल : 16 पदे
मेकॅनिकल (Electrical): 10 पदे
मेकॅनिकल (Electronics): 9 पदे
वय
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 22 वर्षे दरम्यान असावे. उमेदवारांचा जन्म 1 मे 2002 ते 5 मे 2005 दरम्यान झालेला असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत आहे.
निवड कशी होईल
या भरती मोहिमेसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या परीक्षेच्या विविध टप्प्यांतील (I – V) कामगिरीवर आधारित आहे. भारतीय तटरक्षक दलातील भरतीसाठी उमेदवारांना स्टेज I, II, III, IV आणि V पार करणे अनिवार्य आहे.
परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व उमेदवारांना बायोमेट्रिक, फोटो ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी अनिवार्यपणे करावी लागेल.
तुम्हाला पगार किती मिळेल
नाविक (जनरल ड्युटी) च्या पदांवर निवड झालेल्यांना वेतन स्तर-3 अंतर्गत 21,700 रुपये वेतन दिले जाईल. नाविक (घरगुती शाखा) आणि नाविक (DB) च्या पदांसाठी उमेदवारांना 21,700 रुपये आणि मेकॅनिकलच्या पदांसाठी, 29,200 रुपये दिले जातील. या भरती मोहिमेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.