Indian Navy MR Recruitment 2022 : भारतीय नौदलात (Indian Navy) करिअर करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नेव्हीच्या अग्निपथ भरती 2022 (Agneepath Recruitment 2022)अंतर्गत भारतीय नौदल अग्निवीर SSR या पदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम मुदत आहे.
त्यामुळे लवकरात लवकर नौदलात सामील होण्यास इच्छुक असलेल्या तरुणांनी अग्निवीर एसएसआर (Agniveer SSR) पदासाठी अर्ज (Application) करावा.
अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांसाठी (candidate) एकूण 200 जागा उपलब्ध आहेत, MR स्टीवर्ड, MR शेफ आणि MR हायजिनिस्ट या पदांसाठी महिला उमेदवारांसाठी 40 रिक्त जागा आहेत.
अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार ज्यांनी त्यांची मॅट्रिक परीक्षा किंवा 10वी उत्तीर्ण केली आहे आणि 1 डिसेंबर 1999 ते 31 मे 2005 दरम्यान जन्म घेतला आहे ते या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आधी 30 जुलै 2022 होती पण आता ती 1 ऑगस्ट 2022 आहे.
NAVY MR भर्ती 2022: अर्ज कसा करावा
– नौदलात अग्निवीर म्हणून अर्ज करण्यासाठी उमेदवाराला joininidiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
– मुख्यपृष्ठावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल आणि नंतर लॉगिन करावे लागेल.
– अग्निवीरसाठी अर्ज करण्यासाठी – तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
– येथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख यासारखी माहिती भरावी लागेल.
– शेवटी अर्जाची फी भरून फॉर्म जमा करावा लागतो.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत, पात्रता परीक्षेत (10वी) मिळवलेल्या एकूण टक्के गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना नंतर लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल.
लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणीसाठी आधार कार्ड आवश्यक असेल. लेखी परीक्षा आणि शारीरिक तंदुरुस्ती चाचणीमधील कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेत नोव्हेंबर 2022 पर्यंत गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
वय श्रेणी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 17 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे.