Indian Railways : मागील दोन दशकांमध्ये रेल्वे सवलती हा खूप गाजलेला विषय आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी अनेक सवलती उपलब्ध करून देत असते. ज्याचा फायदा काही प्रवाशी माहिती असल्यामुळे घेतात तर काही प्रवाशांना याबद्दल कोणतीच माहिती नसते.
तसेच रेल्वेने काही नियम खूप कडक केले आहेत. अशातच आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये सवलत देण्याच्या विचारात आहे. जर रेल्वेने असा निर्णय घेतला तर याचा फायदा देशातील लाखो लोकांना होईल.

2022-2023 मध्ये 64 कोटी प्रवाशांनी केला प्रवास
सवलत पूर्ववत करण्याची मागणी
मालवाहतूक क्षेत्रातही दक्षिण रेल्वेने अनेक यश संपादन केले असून यात आतापर्यंतचे सर्वात जास्त 4.05 मेट्रिक टन कार्गो लोडिंग, 5.2 मेट्रिक टन पेट्रोलियम आणि 3.23 मेट्रिक टन अन्नधान्याचे सर्वाधिक लोडिंग यांचा समावेश आहे. रेल्वेच्या प्रचंड कमाईनंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर दिली जाणारी सवलत पुन्हा देण्याची मागणी सतत होत आहे.
रेल्वेने यापूर्वी म्हणजे मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात दिलेली सूट बंद केली होती. विशेष म्हणजे रेल्वेकडून सर्व सुविधा नियमित केल्यानंतरही प्रवासी भाड्यातील सवलत पुन्हा सुरू करण्यात आली नाही. आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे सांगितले होते की, रेल्वेकडून प्रवाशांना अगोदरच 55 टक्के सवलत दिली जात आहे. परंत आता महसुलात वाढ झाल्यामुळे भाड्यातील सूट पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.













