Indian Railways Update : दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेकडून अनेक सोयी-सुविधा करून देण्यात आल्या आहे. मात्र अनेकांना त्या माहिती नाहीत त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.
यापैकी रेल्वेची अशीच एक योजना आहे ज्याविषयी अनेक प्रवाशांना माहिती नाही. जर तुम्हालाही ही योजना माहिती नसेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. तरच तुम्हालाही भारतीय रेल्वेकडून लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. कसे ते जाणून घ्या.

असा मिळवा प्रवास विमा?
जर तुम्हाला रेल्वेमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्यायचा असल्यास तुम्हाला तिकीट बुक करत असताना त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. जेव्हा IRCTC वरून रेल्वे तिकीट ऑनलाइन खरेदी करण्यात येते तेव्हा त्यात प्रवास विम्याचा पर्याय दिला जातो. जर तुम्ही तो निवडला तर तुम्हाला यासाठी फक्त 35 पैसे द्यावे लागणार आहे. त्या बदल्यात, IRCTC तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर मिळते.
जेव्हा तुम्ही 35 पैसे भरून विमा काढत असता तेव्हा तिकीट बुक होताच क्षणी ईमेल आणि मेसेजद्वारे कागदपत्र पाठवण्यात येतात ते उघडल्यानंतर, नामनिर्देशित व्यक्तीचे डिटेल्स लगेच भरावे. नाहीतर, भविष्यात दावा करत असताना तुम्हाला अनेक समस्या येईल.
किती कव्हर देण्यात येतो?
आयआरसीटीसीच्या वेबसाइटनुसार, कलम 123, 124 आणि 124ए अंतर्गत रेल्वे अपघातांचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची पात्रता रेल्वे अधिनियम 1989 नुसार विहित केली आहे.
- प्रवाशाचा मृत्यू झाला तर – 10 लाख रुपये (100 टक्के)
- पूर्णपणे अक्षम – रु 10 लाख (100 टक्के)
- अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व – रु 7.5 लाख
- दुखापत झाल्यास हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी – रु. 2 लाख
- मृत अवशेषांच्या वाहतुकीसाठी – 10,000 रु
काय आहेत अटी आणि नियम?
- हे लक्षात ठेवा की IRCTC ने दिलेली ही सुविधा केवळ ई-तिकीट बुक करणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू आहे.
- ही योजना ऐच्छिक असून जर कोणी ती निवडली तरच त्याचा त्या व्यक्तीला लाभ मिळतो.
- एका PNR क्रमांकावरून दोन किंवा अधिक तिकिटे बुक केले तर, हे सर्वांसाठी लागू होते.
- प्रवास विम्याची ही सुविधा केवळ कन्फर्म किंवा CNF/RAC साठी असणार आहे.
- IRCTC कडून ही सुविधा 1 नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे. यासाठी प्रति प्रवासी 35 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
- या पॉलिसीची माहिती ग्राहकाला एसएमएस आणि ईमेलद्वारे देण्यात येते. तसेच या पॉलिसीचे कव्हरेज पीएनआर अंतर्गत प्रत्येक प्रवाशासाठी असणार आहे.
- तसेच हे लक्षात ठेवा की 5 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी पर्यायी प्रवास विमा प्रदान करण्यात येणार नाही जे बर्थ/सीटशिवाय तिकीट बुक करतात.













