Indian Railways : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सगळ्यात मोठे रेल्वे नेटवर्क असून देशभरात एकूण 7 हजार 349 रेल्वे स्थानक आहेत. दररोज देशात कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. अनेकांना एखाद्या ठिकाणी प्रवास करायचे असेल तर ते रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असतात.
भारतात अशी फार कमी लोक आहेत ज्यांनी कधीच रेल्वेने प्रवास केला नाही. अनेक रेल्वे स्थानकावर जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल असे शब्द आपण पहिले असतील मात्र या शब्दांचा अर्थ काय असतो? असा प्रश्न अनेकांना पडतो.
रेल्वे प्रवास करत असताना अशा अनेक गोष्टी समोर येतात, ज्याची त्यांना माहिती कोणालाच नसते. खरं तर जंक्शन आणि सेंट्रल अशी स्थानकांची नावे पाहिल्यावर त्यांच्या मागे जंक्शन लिहिले असते. टर्मिनल आणि टर्मिनसच्या बाबतही असेच आहे. हे शब्द त्या स्थानकाची महत्त्वाची माहिती देत असतात.
काय असतो या शब्दांचा अर्थ
रेल्वे मार्गात येणाऱ्या अनेक स्थानकांच्या नावामागे जंक्शन लिहिले जाते. अनेकदा ते प्रमुख स्थानकाच्या नावामागे असते आणि जर एखाद्या स्थानकाच्या नावामागे जंक्शन लिहिले असल्यास याचा अर्थ या स्थानकावर जाण्यासाठी रेल्वेला एकापेक्षा जास्त मार्ग उपलब्ध आहेत.जर एखादी रेल्वे एका मार्गाने येत असल्यास ती दोन मार्गांनी जाते. अशा स्थानकांच्या मागे केवळ जंक्शन लिहितात.
तर काही रेल्वे स्थानकांच्या शेवटी सेंट्रल लिहिले जाते. त्याचा अर्थ असा आहे की त्या शहरात एकापेक्षा जास्त रेल्वे स्टेशन उपलब्ध आहेत. ज्या स्टेशनच्या शेवटी सेंट्रल लिहिले असते ते त्या शहरातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे. इतकेच नाही तर ते स्थानक हे शहरातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक असल्याची माहिती सेंट्रलवरून मिळते. भारतात सध्या अशी एकूण ५ मध्यवर्ती स्थानके आहेत.
समजा जर एखाद्या रेल्वे स्थानकासमोर टर्मिनस किंवा टर्मिनल असे लिहिले असल्यास त्याचा अर्थ त्या स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रॅक नाही. म्हणजे ज्या दिशेनं ट्रेन इथे येते, त्याच दिशेनं परत जाते. सध्या भारतात अशी २७ स्थानके आहेत, जिथे टर्मिनस किंवा टर्मिनल असे लिहिले आहे.