Gram Panchayat Election Result : इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाईंचा दणदणीत विजय ! बनल्या थेट या गावच्या सरपंच 

Published on -

Gram Panchayat Election Result : राज्यभर ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुरळा आज उडाला आहे. या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई सरपंच बनल्या आहेत. 

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले.

रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झाले. राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी आपला गड राखला आहे तर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक मोठ्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांनी संगमनेर तालुक्यतील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवला आहे. शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत मोठा विजय मिळवल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. अपक्ष उमेदवारी दाखल करत त्यांनी सगळ्यांना धोबीपछाड केले आहे आणि थेट सरपंचच बनल्या आहेत.

या निवडणुकीत शशिकला पवार यांनी सुशिला उत्तम पवार यांचा पराभव केला आहे. शशिकला पवार यांनी 227 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अपक्ष निवडणूक लढलेल्या शशिकला पवार आता कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात यावरुन विविध चर्चा रंगत आहेत. आता शशिकला पवार नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe