अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य कार्यक्षेत्रातील कुळधरणनजीकच्या मोतिरा जंगलात काळविटाची शिकार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
दरम्यान या धक्कादायक प्रकाराची वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी काळविटाच्या शिकारीतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कुळधरणनजीकच्या मोतिरा जंगलात एका काळवीटाची शिकार करण्यात आली असल्याचे समजले.
याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी केदार यांनी बिटच्या वनरक्षकांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एक नर काळविटाची शिकार झालेली आढळून आली.
केदार यांनी सूचित केल्यानुसार राशीन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन करून अहवाल दिला.
या प्रकारासंदर्भात बोलताना सागर केदार म्हणाले, मांसाचे काही नमुने पुढील तपासासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. घटनेतील गुन्हेगाराची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल व त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम