नाशिकधील संतापजनक घटना, मुलीला मासिक पाळी आली होती म्हणून…

Published on -

Maharashtra News:पुरोगीमी महाराष्ट्रात स्त्रियांना येणाऱ्या मासिक पाळीसंबंधीचे गैरसमज केवळ अशिक्षित नव्हे तर शिकलेल्या लोकांमध्ये आहेत. एवढेच काय तर ज्यांनी शिक्षण द्यायचे, त्याच शिक्षकांमध्येही ते आहेत, हे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पुढे आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळा येथील शिक्षकाने एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना घडली आहे.

मासिक पाळी आलेल्या मुलीने झाड लावले तर ते झाड जळतं. असा अजब तर्क शिक्षकांनी लावला आहे. या मुलीने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार देखील केली आहे. तर राज्य महिला आयोगानेही याची दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला आहे.

या मुलीने सांगितले की, त्र्यंबकेश्वरच्या येथील देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत मागील आठवड्यात वृक्षारोपण करण्यात आळे. यावेळी दहा मुलींच्या हस्ते झाडे लावण्यात येणार होती. तेव्हा शिक्षकांनी त्यातील मासिक पाळी असलेल्या विद्यार्थिनीला बाहेर काढले.

याचे कारण शिक्षक म्हणाले, ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्यांनी झाडे लावायची नाही. त्यांनी लावलेली झाडे लवकर मरतात. याशिवाय मुलींनी लावलेल्या झाडांकडे सुद्धा यायचे नाही, अशी तंबी शिक्षकांनी दिल्याची मुलीची तक्रार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, ही बाब अतिशय निंदनीय आहे. या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe