Interesting Gk question : जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : आंध्रप्रदेश हे राज्य तीन राजधानी असलेले कितवे राज्य आहे?
उत्तर : एकमेव पहिले राज्य आहे.
प्रश्न : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे?
उत्तर : नावासेवा
प्रश्न : सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कशातून घेण्यात आले आहे?
उत्तर : उपनिषेदक मुंडक
प्रश्न : वाघोबा खिंड हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते?
उत्तर : पालघर जिल्हा
प्रश्न : परमवीर चक्र हा पुरस्कार स्वातंत्र्यप्राप्ती पासून किती लोकांना मिळालेला आहे?
उत्तर : २१ व्यक्तींना परमवीर चक्र पुरस्कार मिळालेला आहे.
प्रश्न : नळगंगा जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे?
उत्तर : बुलढाणा जिल्हा
प्रश्न : भारतरत्न पुरस्कारावर कशाचे चित्र असते?
उत्तर : सूर्य (भारतरत्न पुरस्कारावर सूर्याचे चित्र असते)