Mutual Funds : ‘या’ म्युच्युअल फंडात फक्त एक वर्ष करा गुंतवणूक, दुप्पट कराल कमाई!

Published on -

Mutual Funds : सध्या लोकांचा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे कल वाढत चालला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथे मिळणार प्रचंड नफा. येथील गुंतवणूक जोखमीची असली तरी देखील येथील परतावा हा खूप जास्त आहे, म्हणूनच मोठ्या प्रमाणात लोकं  येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. आज आम्ही अशाच काही म्युच्युअल फंडाबाबत सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षातच श्रीमंत केले आहे.

-आदित्य बिर्ला सन लाइफ पीएसयू इक्विटी म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात सर्वोत्तम परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 95.54 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाख रुपयाचे 1.95 लाख रुपये केले आहेत. म्हणजेच येथून गुंतवणूकदारांनी दुप्पट परतावा कमावला आहे.

-मोतीलाल ओसवाल एसएंडपी बीएसई एन्हांस्ड वैल्यू इंडेक्स म्यूचुअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 91.26 टक्के परतावा दिला आहे. येथे एका वर्षात 1 लाख रुपयाचे अंदाजे 1.91 लाख रुपये मिळाले आहेत.

-SBI PSU म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 90.29 टक्के परतावा दिला आहे. या म्हणजेच एका वर्षात 1 लाख रुपयाचे अंदाजे 1.90 लाख रुपये केले आहेत.

-Invesco India PSU इक्विटी म्युच्युअल फंडाने गेल्या एका वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 88.98 टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाख रुपये अंदाजे 1.89 लाख रुपये केले आहेत.

-ICICI प्रुडेन्शियल PSU इक्विटी म्युच्युअल फंडाने देखील गेल्या एका वर्षात बक्कळ परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 12 महिन्यांत सुमारे 85.87 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात या फंडाने 1 लाख रुपयाचे अंदाजे 1.86 लाख रुपये केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News