Central Government Scheme : पीपीएफ योजनेत गुंतवणूक करताय? सरकारने पुन्हा केला नियमांत मोठा बदल! जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Updated:

Central Government Scheme : चांगल्या भविष्यासाठी अनेकजण गुंतवणूक करतात. परंतु, सरकारी योजनेची माहिती नसल्यामुळे अनेकांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अनेकजण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करतात.

कारण या सरकारच्या योजनेत परतावा जास्त आणि कोणतीही जोखीम नाही. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करणार असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता सरकारने नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या नियमानुसार तुम्ही पैसे कधी काढू शकता? ते पहा.

चक्रवाढ व्याजाचा असा घ्या लाभ

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत तुम्हाला कंपाउंडिंगच्या आधारे 7.1 टक्के परतावा मिळत आहे. यात अनेक वेळा असे घडते की तुम्ही पैसे गुंतवता, परंतु हे पैसे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत काढावे लागतात, परंतु तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी खात्यातून पैसे कसे काढू शकता.

असे काढा मॅच्युरिटीपूर्वी पैसे

अनेक वेळा असे दिसून आले आहे की, जर तुम्ही वेळेपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला पैसे काढण्याचे कारण सांगावे लागते. परंतु,तरीही तुम्हाला पूर्ण रक्कम मिळत नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या नियमांनुसार, तुम्ही 6 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकता तसेच 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते बंद करू शकता. मात्र जर तुम्हाला 6 वर्षापूर्वी काही पैसे काढायचे असल्यास तुमच्याकडे काढण्याचे वैध कारण असावे, तरच तुम्ही पैसे काढू शकता.

जसे की तुम्हाला कोणत्याही आजारावर उपचार करायचे असतील किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उपचारासाठी पैसे काढू शकता. इतकेच नाही तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या लग्नासाठीही पैसे काढता येतात.

जाणून घ्या नियम

1. पीपीएफमध्ये पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
2. त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म सी डाउनलोड करावा लागणार आहे.
3. तो फॉर्म भरल्यानंतर तो बँकेत जमा करा.
4. तुमचे PPF खाते बँकेला दाखवावे लागेल.
5. यानंतर बँक तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम देईल.

500 रुपयांपासून करता येते गुंतवणूक

या योजनेत 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. आर्थिक वर्षात, तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर कर्ज आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधाही तुम्हाला मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe