Investment Return : पोस्ट ऑफिसची ‘ही’ सरकारी बचत योजना 10 वर्षात करेल मालामाल !

Content Team
Published:
Investment Return Double

Investment Return Double : लोकांना बचतीची सवयी लागावी यासाठी सरकाद्वारे अनेक बचत योजना राबवल्या जातात. यामध्ये पोस्टाच्या लहान बचत योजना सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. पोस्टाकडून चालवली जाणारी किसान विकास पत्र योजना ही देखील अशीच एक योजना आहे, जी तुम्हला 115 महिन्‍यांतच दुप्पट परतावा देते.

जो कोणी गुंतवणूकदार या किसान विकास पत्र योजनेत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पैसे गुंतवतो त्याला दुप्पट रक्कम मिळते. या सरकारी योजनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये गुंतवणुकदारांना चक्रवाढीचाही लाभ मिळतो, त्यामुळे ही योजना लहान बचत करणाऱ्यांसाठीही चांगली ठरते.

गुंतवणुकीची मर्यादा किती रुपये आहे?

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता. परंतु, कोणतीही व्यक्ती केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.

जर कोणत्याही गुंतवणूकदाराला त्याचे पैसे दुप्पट करायचे असतील, तर किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जोरदार परतावा मिळेल. जर तुम्ही त्यात 10 लाख रुपये गुंतवले तर 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्षे 7 महिन्यांत ही रक्कम 20 लाख रुपये होते. लोकांना कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही मोठा परतावा मिळाला आहे.

एका खात्यात किती गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात?

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार संयुक्त किंवा एकल खाते उघडू शकतात. संयुक्त खाते देखील तीन लोक एकत्र उघडू शकतात. मुदतपूर्तीपूर्वी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, खात्यातील रक्कम कायदेशीर वारसाला दिली जाईल आणि त्याला परतावाही दिला जाईल. पैशांची गरज किंवा आर्थिक समस्या असल्यास, गुंतवणूकदार परिपक्वतापूर्वी किसान विकास पत्र खाते बंद करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe