Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Investment Schemes

Investment Schemes : लगेचच करा गुंतवणूक! होईल करोडोंचा फायदा, कसं ते जाणून घ्या

Monday, October 16, 2023, 3:49 PM by Ahilyanagarlive24 Office

Investment Schemes : सध्या अनेक गुंतवणुकीसाठी योजना उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता. काही योजनांमध्ये सर्वात जास्त व्याज मिळत असते. परंतु अनेकांना याबद्दल माहिती नसते.

अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कि गुंतवणुकीवर करोडो रुपयांचा परतावा मिळेल. हे लक्षात घ्या गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त असते. काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर.

Investment Schemes
Investment Schemes

कमीत कमी गुंतवणुकीत करोडो रुपये जमा करणे थोडे कठीण आहे. परंतु हे काम पीपीएफ योजनेमुळे शक्य आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पीपीएफ खाते 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवता येते. पीपीएफ खात्यात प्रत्येक वर्षी 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागते. मासिक पेमेंट रु 8333.3 च्या हप्त्यांमध्ये विभागले गेले असून त्यानंतर 25 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर PPF रक्कम 1,03,08,015 रुपये असेल.

करमुक्त उत्पन्न

हे लक्षात घ्या की पीपीएफ खाते ट्रिपल ई श्रेणीमध्ये येते. पीपीएफ योजना खूप लोकप्रिय आहेत जिथे गुंतवणूक करणे खूप सुरक्षित मानले जाते. देशातील सरकार गुंतवणुकीसाठी हमी देते. सरकार दर तिमाहीत व्याजदर ठरवत असते ए लक्षात घ्या. PPF हा इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा चांगला असून तुम्ही केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त असते आणि PPF मधून मिळालेल्या रिटर्नवर कोणताही कर नसतो.

आवश्यक कागदपत्रे

समजा तुम्ही पीपीएफ खाते चालू करणार असाल तर तुमच्याकडे ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, पे-इन-स्लिप, नॉमिनेशन फॉर्म असावा.

कोणाला चालू करता येते खाते?

देशातील कोणताही नागरिक या योजनेत खाते चालू करू शकतो. तुम्ही ते तुमच्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने देखील चालू करू शकता. तुम्हाला ऑनलाइन बँकिंगद्वारे पीपीएफ खाते चालू करता येईल. तुम्ही शाखेत न जाता खाते चालू करू शकता.

खाते चालू करण्यासाठी तुम्हाला काही पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे एसबीआयमध्ये एसबीसीए खाते असणे खूप महत्त्वाचे आहे. या खात्याचे केवायसीही आवश्यक आहे.

Categories ताज्या बातम्या Tags Investment in PPF, Investment Plan, Investment Schemes, PPF, PPF Account, PPF investment
Samsung Galaxy Z Flip5 : स्टायलिश लूक आणि शानदार फीचर्स! इतक्या स्वस्तात खरेदी करा नवीन Galaxy Z Flip5
MIS Yojna : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, फक्त 1000 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक !
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress