iPhone 14 : सुवर्णसंधी! iPhone 14 खरेदी करा 30 हजारांपेक्षा जास्त सवलतीत, पहा संपूर्ण ऑफर

iPhone 14

iPhone 14 : इतर स्मार्टफोन कंपन्यांपेक्षा iPhone ची किंमत जरा जास्त असते. नुकताच कंपनीचा iPhone 15 लाँच झाला आहे. परंतु तुम्ही आता सवलतीत iPhone 14 खरेदी करू शकता. अशी ऑफर फ्लिपकार्टवर मिळत आहे.

30 हजार रुपयांपेक्षा जास्त सवलतीत तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. तसेच तुम्ही Realme 11 Pro 5G आणि Oppo Reno 8T 5G हे दोन स्मार्टफोनही कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर आणि स्मार्टफोनच्या नवीनतम किमती.

आयफोन 14 ऑफर

128 GB अंतर्गत स्टोरेजसह iPhone 14 चा ब्लू कलर व्हेरिएंट हा 69,900 रुपयांच्या मूळ किमतीसह येतो. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका, कारण तुम्ही डिस्काउंटनंतर 64,999 रुपयांना सहज खरेदी करू शकता. तसेच Flipkart Axis Bank कार्डद्वारे पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना 5% कॅशबॅक देण्यात येत आहे.

या एक्सचेंज ऑफरमध्ये फोन 30,600 रुपयांपर्यंत आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. या फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले पाहायला मिळेल. A15 बायोनिक चिपसेटवर काम करत असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.

Realme 11 Pro 5G ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर 100 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असणारा हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असून त्याची मूळ किंमत 27,999 रुपये इतकी आहे, परंतु या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 24,999 रुपयांमध्ये सहज ऑर्डर करू शकता.

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही स्मार्टफोनची किंमत 23 हजार रुपयांनी कमी करू शकता. तसेच कंपनी या स्मार्टफोनवर 5% कॅशबॅक देत आहे. या फोनमध्ये तुम्हाला फ्लॅगशिप अनुभवासाठी डायमेंशन 7050 चिपसेट पाहायला मिळेल. कंपनीच्या या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh असून जी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo Reno 8T 5G ऑफर

स्टोरेजचा विचार केला तर Oppo चा हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असून या सेलमध्ये तुम्ही 38999 रुपयांच्या मूळ किमतीऐवजी 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. याच्या बँक ऑफरमध्ये तुम्हाला 5% कॅशबॅक दिला जाईल.

तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 27,550 रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करता येईल. याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, स्मार्टफोन 108-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेराने सुसज्ज असून 120Hz रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले यात देण्यात आला आहे. हा फोन 67W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe