iPhone 15 Pro : व्वा! ‘या’ शक्तिशाली फीचर्सने सुसज्ज असणार iPhone 15 Pro, लॉन्चपूर्वी समोर आली माहिती

Published on -

iPhone 15 Pro : आयफोन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय बाजारपेठेत iPhone 15 Pro लॉन्च होणार आहे. परंतु लॉन्च होण्यापूर्वीच या फोनचे फीचर्स लीक झालेले आहेत. यापूर्वीही या फोनची माहिती लीक झाली होती.

रिपोर्टनुसार कंपनी आपला आगामी फोन सप्टेंबर महिन्यात लाँच करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये फिजिकल सिमसाठी एकही स्लॉट उपलब्ध नसणार आहे. कंपनी आपला आगामी फोन ई-सिम सह सादर करणार आहे.

असे असणार iPhone 15 Pro चे संभाव्य डिझाइन

नुकतेच iPhone 15 Pro चे काही रिजोल्यूशन रेंडर प्रकाशित झाले आहेत. यापूर्वी, iPhone 15 Pro च्या CAD फाइल्स उघड झाल्या होत्या. आता नवीन अहवालानुसार, आयफोन 15 प्रो टायटॅनियम फ्रेम आणि गुळगुळीत कडांसह येऊ शकते, जे सध्याच्या लाइनअपच्या तीक्ष्ण कडांपेक्षा थोडे वेगळे आहे.

जाणून घ्या संभाव्य वैशिष्ट्ये

नवीन लीकमुळे असे सूचित झाले आहे की आयफोन 15 प्रो अत्यंत पातळ बेझलसह ऑफर करण्यात येईल. या डिस्प्लेवरील बेझल फक्त 1.55mm असू शकतात, जे Xiaomi 13, Galaxy S23 आणि iPhone 14 Pro च्या बेझलपेक्षा कमी असेल. तर नवीन आयफोनसह कॅमेरा मॉड्यूलमध्ये बदल असू शकतात.

तर कंपनी कॅमेरासह सेन्सर आकारात नवीन अपग्रेड करेल. तर आगामी आयफोन 15 प्रो सीरीजमध्ये उत्तम स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तर उपलब्ध असणार आहे. यामुळे डिस्प्लेचा आकार कमी न करता फोन अधिक कॉम्पॅक्ट होईल असा दावा करण्यात येत आहे.

सिम कार्ड स्लॉट नसणार

आयफोन 15 सीरीज फक्त ई-सिम सह सादर करण्यात येत आहे. त्यामुळे फिजिकल सिमसाठी एकही स्लॉट उपलब्ध होणार नाही. म्हणजेच Apple आपली आगामी iPhone 15 सीरीज केवळ ई-सिमसह ऑफर केली जाईल.

हे लक्षात घ्या की कंपनीने आयफोन 14 सीरीज केवळ यूएस मार्केटमध्ये ई-सिमसह सादर केली आहे, मात्र भारतीय बाजारपेठेत, आयफोन 14 मालिका ई-सिम आणि फिजिकल सिम स्लॉटसह उपलब्ध झाली आहे. आयफोन 15 सीरीज अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फक्त ई-सिमसह लॉन्च केली जाणार आहे असा रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe