iPhone Offer : बंद होण्यापूर्वी स्वस्तात खरेदी करता येणार iPhone 12 आणि iPhone 13, जाणून घ्या किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

iPhone Offer : इतर स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनची किंमत जास्त असते. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही आयफोन खरेदी करता येत नाही. नुकतीच आयफोनची आगामी सीरिज लाँच होणार आहे. या सीरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro तसेच iPhone 15 Pro Max या फोनचा समावेश असणार आहे.

अशातच आता आयफोनप्रेमींना खूप कमी किमतीत iPhone 12 आणि iPhone 13 खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची हजारो रुपयांची बचत होईल. आयफोनप्रेमींना अशी भन्नाट संधी कुठे मिळत आहे? जाणून घ्या.

असे सांगण्यात येत आहे की लवकरच iPhone 12 आणि iPhone 13 चे काही मॉडेल्स बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे कंपनी स्टॉक क्लिअर करण्यासाठी कमी किमतीत फोनची विक्री करत आहे, ज्यामुळे iPhone 12 आणि iPhone 13 स्वस्तात खरेदी करता येत आहे.

आयफोन 13 ऑफर

iPhone 13 ची निवडक मॉडेल्स बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे यावर 31 हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे, परंतु यासाठी ग्राहकाला चांगल्या स्थितीत येणारा फोन बदलावा लागणार आहे.

बंद होणार ही मॉडेल्स

एका रिपोर्टनुसार, आयफोन 15 सीरीज लॉन्च झाल्यानंतर आयफोनचे जुने मॉडेल्स बंद होतील. iPhone 12, iPhone 13 Mini, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बंद करण्यात येतील. तर काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की iPhone 12 बंद करण्याची तयारी कंपनीकडून सुरू आहे.

सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आगामी सीरीज

iPhone 15 सीरीज सप्टेंबर महिन्यामध्ये लॉन्च होईल. या सीरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro तसेच iPhone 15 Pro Max या फोनचा समावेश असून शकतो. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास iPhone 15 मध्ये परफॉर्मन्ससाठी Apple A17 Bionic चिपसेट दिला जाईल. यात 6.1 इंच डिस्प्ले, 256GB पर्यंत स्टोरेज, 12 MP + 12 MP रियर कॅमेरा, 4200 mAh बॅटरी आणि 8 GB पर्यंत रॅम असण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe