iPhone Offers : गनवीन वर्षांपूर्वी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात अनेक ऑफर्स उपल्बध आहे. या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही देखील नवीन iPhone खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
नवीन iPhone खरेदीवर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन तुमचे हजारो रुपये वाचवू शकतात. चला तर जाणून घ्या तुम्ही iPhone कोणत्या पद्धतीने स्वस्तात खरेदी करू शकतात . या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो विजय सेल्सने 31 डिसेंबरपर्यंत सेलची घोषणा केली आहे.
कंपनीने दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त Apple Days मोहीम सुरू केली आहे. या सेलमध्ये कंपनी सर्व अॅपलच्या उत्पादनांवर बंपर डील्स देत आहे ज्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा देखील होत आहे. याशिवाय विजय सेल्सच्या वेबसाइटवरही ऑफर्स देण्यात येत आहेत.
या सेलमध्ये नुकताच लॉन्च झालेला आयफोनही अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे. iPhone 14 फक्त 61,900 रुपयांना खरेदी करता येईल. भारतात iPhone 14 ची किंमत 79,900 रुपये आहे. पण, डीलच्या किमतीवर HDFC बँकेच्या कार्डने त्यावर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे.
एक्सचेंज ऑफरचा फायदा
याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळत आहे. फोनवर 15000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू दिली जात आहे. याशिवाय विजय सेल्स 3000 रुपये सूटही देत आहे. यामुळे एकूण एक्सचेंज सूट 18,000 रुपये होते. यामुळे फोनची किंमत 61,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
इतर iPhones वर देखील सूट
विजय सेल्स इतर आयफोन देखील सवलतीत विकत आहे. याशिवाय, कंपनी सीरीज 8 वॉच, एअरपॉड्स प्रो (2nd जनरेशन), मॅकबुक्स, iPads, घड्याळे, Apple Care+, Apple Accessories वरही सूट देत आहे.
सेल दरम्यान, iPhone 12 ची किंमत 52,900 रुपयांपासून सुरू होते तर iPhone 13 ची किंमत 62,900 रुपयांपासून सुरू होते. iPad 9th Gen ची किंमत 25,700 रुपयांपासून सुरू होते. तर iPad Pro ची किंमत 73 हजार रुपयांपासून सुरू होते. लॅपटॉपमधील MacBook Air M1 ची किंमत 77,900 रुपयांपासून सुरू होते.
हे पण वाचा :- Best SUV : बाजारात धुमाकूळ घालत आहे ‘ही’ परवडणारी SUV ; खरेदीसाठी जमली तुफान गर्दी ! जाणून घ्या त्याची खासियत