iPhone Offers : इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर क्रोमाने (Electronics retail store Croma) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रोमा दिवाळी सेल 2022 ची (Croma Diwali Sale 2022) घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन (smartphones) आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर (electronics products) मोठी सूट दिली जात आहे.
क्रोमा दिवाळी सेलमध्ये iPhone 13 सोबत Apple Watch देखील मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. आजपासून म्हणजेच 27 सप्टेंबरपासून सेल सुरू झाला आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम ऑफर्सबद्दल जाणून घ्या.
iPhone 13
क्रोमाच्या दिवाळी सेलमध्ये, iPhone 13 चा 128 GB व्हेरिएंट 69,900 रुपये किंमतीचा 51,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनवर 17,910 रुपयांची सूट मिळत आहे. सेलमध्ये iPhone सोबत, Apple Watch SE देखील 19,990 रुपयांच्या किमतीत 33 टक्के मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. आयफोनची विक्री दुपारी 4.45 पासून थेट सुरू झाली आहे. मात्र, हा सेल किती काळ चालणार हे कंपनीने सांगितलेले नाही. सवलतीमध्ये बँक ऑफर आणि कॅशबॅक देखील समाविष्ट आहे.
क्रोमा सेलमध्ये बँक ऑफर
Croma’s Diwali Sale HDFC बँक क्रेडिट कार्ड खरेदीवर 10 टक्के सूट देत आहे. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीवर कॅशबॅकसोबतच इन्स्टंट एक्सचेंजची सुविधाही मिळणार आहे.
गेमिंग लॅपटॉप आणि सॅमसंग स्मार्टफोनवर ऑफर
क्रोमाच्या सेलमध्ये लेनोवो आणि इतर कंपन्यांच्या गेमिंग लॅपटॉपवर 50 टक्क्यांहून अधिक सूट. सेलमध्ये, Lenovo IdeaPad 54 टक्के डिस्काउंटसह 45,990 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. Intel Core i5 10th Gen प्रोसेसरसह लॅपटॉपमध्ये 8 GB रॅम आणि 512 GB SSD स्टोरेज आहे.
Croma Diwali Sale 2022 मध्ये Samsung Galaxy FE 5G 30 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. त्याच वेळी, वनप्लसचा 43-इंचाचा फुल एचडी स्मार्ट टीव्ही 19,999 रुपयांच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. सेलमध्ये इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही उत्तम ऑफर्स पाहायला मिळत आहेत.