iPhone Offers : फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) सुरू होणार आहे. पण, सेल सुरू होण्याआधी अॅपलचा आयफोन (Apple iPhone) खूपच कमी किमतीत विकला जात आहे.
हा फोन तुम्ही 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर फ्लिपकार्ट बंपर ऑफर्स देत आहे. यासोबत तो केवळ 11,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Flipkart Big Billion Days सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
सेल सुरू होण्यापूर्वीच अनेक फोन डिस्काउंटसह विकले जात आहेत. Apple iPhone SE (2nd generation) आणि Apple iPhone SE (3rd generation) देखील Flipkart वर बंपर डिस्काउंटसह विकले जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही हे फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
iPhone SE ची 2nd जनरेशन आता 30,499 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. हे त्याच्या मूळ किमतीच्या 39,900 रुपयांपेक्षा 9,401 रुपये कमी आहे. याशिवाय यावर 19 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.
एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्या
तथापि, एक्सचेंज ऑफरचे मूल्य तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास, तुम्ही हा आयफोन 11,499 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Apple iPhone SE (2nd जनरेशन) मध्ये A13 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4.7-इंचाची रेटिना एचडी स्क्रीन आहे. याच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 7-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय iPhone SE 3rd जनरेशन देखील डिस्काउंटसह विकली जात आहे. यावर 19,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. यासोबत तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवर 24,900 रुपयांना खरेदी करू शकता. वर नमूद केल्याप्रमाणे, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते.
या सेलपूर्वी मायक्रो साइटही तयार करण्यात आली आहे. यामध्ये आगामी डील्सच्या टीझरबद्दल माहिती देण्यात आली आहे. टीझरनुसार, सेल दरम्यान iPhone 13 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय इतर आयफोनही सवलतीने विकले जातील.