IRCTC : IRCTC सतत आपल्या पर्यटकांसाठी टूर पॅकेज सादर करत असते. ज्याची किंमत खूप कमी असते. त्यामुळे पर्यटकांना कमी किमतीत शानदार ठिकाणांना भेट देता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना दिली जाते.
तसेच पर्यटकांना वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना स्वस्तात भेटी द्यायला येतात. दरम्यान, असेच एक खास रॉयल राजस्थान टूर पॅकेज IRCTC ने आणले आहे. ज्यात तुम्हाला प्रसिद्ध ठिकाणांची सैर करता येणार आहे. त्यामुळे भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून राजस्थानमधील सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनस्थळांना भेट देण्याची ही संधी हातातून जाऊ देऊ नका.

कधी होणार सुरुवात?
कोलकाता येथून 20 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू होणाऱ्या 11 रात्री/12 दिवसांच्या या प्रवासात तुम्हाला अजमेर, उदयपूर, चित्तोडगड, अबू रोड, जयपूर, जोधपूर, जैसलमेर तसेच बिकानेर या प्रमुख ठिकाणांना भेट देऊ शकतात.
या स्थानकांवरून सुरू आहे सुविधा
कोलकाता, बंदेल जंक्शन, वर्धमान, दुर्गापूर, आसनसोल, पारसनाथ, धनबाद, गोमोह, हजारीबाग रोड, कोडरमा, गया, डेहरी ऑन सोन, सासाराम आणि डीडी उपाध्याय या स्थानकांवरून प्रवास सुरू करण्याची आणि उतरण्याची सुविधा करण्यात आली आहे.
ही आहेत प्रेक्षणीय स्थळ
अजमेर: अजमेर शरीफ दर्गा, ब्रह्मा मंदिर आणि पुष्कर तलाव
उदयपूर: सिटी पॅलेस, फतेह सागर तलाव, मोती मोगरी
चित्तोडगड: चित्तोडगड किल्ला
अबू रोड: दिलवारा मंदिर, नक्की तलाव, ओम शांती भवन
जोधपूर: मेहरानगड किल्ला आणि उम्मेद भवन
जैसलमेर: सोनार केला, सन सेट पॉइंट
बिकानेर: जुनागड किल्ला
जयपूर: आमेर किल्ला, सिटी पॅलेस, हवा महल, गोविंद मंदिर
किती आहे टूर पॅकेजची किंमत?
किमतीचा विचार केला तर हे पॅकेज इकॉनॉमी, स्टँडर्ड आणि कम्फर्ट अशा तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे. या आधारे त्यांच्या किमती निश्चित केल्या आहेत. इकॉनॉमी क्लास पॅकेजसाठी एका व्यक्तीला 20,650 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर त्याच वेळी, मानक वर्गासाठी 30960 रुपये आणि आराम वर्गासाठी 34110 रुपये खर्च करावे लागणार आहेत.













