उद्धव ठाकरेंवर एक तरी केस आहे का? कारण… राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यामध्ये (Pune) सभा पार पडली. यावेळी भाषणामध्ये त्यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही राज यांनी थेट सवाल केले आहेत.

राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे सतत हिंदुत्वावर बोलत असतात. यांचं हिंदुत्व म्हणजे पकपकपक आहे. उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर असेल.

एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. १९९२-९३ ला दंगल झाली त्यावरच बोलायचं, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच संभाजी नगरच्या मुद्द्यावर शिवसेना (Shivsena) लोकांना झुलवत आहे. त्यामुळे मोदींनी एकदाचं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं. म्हणजे यांचं राजकारणच मोडित निघेल, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, परवा उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगरचं नामांतर झालं काय, नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहेस? तू कोण वल्लभ भाई पटेल? की महात्मा गांधी? मी बोलतोय ना. त्याला काय लॉजिक (Logic) आहे.

इतके वर्ष केंद्रात सत्ता होती. कधी प्रश्न मिटवला का? केवळ निवडणुकीसाठी (Elections) हा विषय जिवंत ठेवायचं आणि मते मिळवायची. याच गोष्टी यांना करायच्या आहेत.

उद्या नामांतर झालं तर बोलायचं कशावर? प्रश्नच मिटला. त्यामुळे आता मोदींनीच औरंगाबादचं नामकरण करून यांचं राजकारण संपवावं, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe