Toll Tax Rules : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अनेक टोल द्यावे लागतात. त्यामुळे तुम्हाला सतत टोल नाक्यावर गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली दिसत असेल. तसेच देशातील सर्व गाड्यांना फास्टॅग बंधनकारक केला आहे.
चारचाकी असेल किंवा इतर कोणते वाहन असेल तर त्यासाठी वेगवेगळे दर आकारले जातात. परंतु, तुम्ही कधी असा विचार केला आहे किंवा तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का की दुचाकी वाहनांकडून किती टोल घेतला जातो.
जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. दुचाकीवरील असणाऱ्या टोल टॅक्सबाबत काय नियम आहेत, हे खूप कमी लोकांना माहिती आहे.
जेव्हा तुम्ही दुचाकी खरेदी करता. त्या वेळेस तुमच्याकडून हा टोल टॅक्स वसूल करण्यात येतो.
त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून दुचाकी वाहने जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल टॅक्स घेतला जात नाही. राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी किंवा त्यापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टॅक्स घेतला जातो.
त्यामुळे जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल किंवा प्रवास करत असाल तर तुम्हाला टोल टॅक्सशी निगडित या नियमांची माहिती असणे खूप गरजेचे आहे.