Someone record my call : तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना? सोप्या पद्धतीने जाणून घ्या

Someone record my call : स्मार्टफोनमुळे सगळे जग अगदी मुठीत आले आहे. अनेक कामे चुटकीसरशी होत आहेत. असे जरी असले तरी तेवढ्याच प्रमाणात फसवणूकही होत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.

अशातच अनेकजण कॉल रेकॉर्ड करत असतात. त्यामुळेही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तुम्ही आता तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय की नाही ते जाणून घेऊ शकता.

1. घोषणा केली जाते

मार्केटमध्ये आता नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन येत आहेत. या नवीन स्मार्टफोन्समध्ये, कॉल रेकॉर्ड होत असताना एक घोषणा केली जात आहे. परंतु जुन्या फोनमध्ये ही सुविधा मिळत नाही. त्यामुळे तुम्ही ते दुसऱ्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

2. ऐकू येतो बीप आवाज

कॉलवर बोलत असताना कॉल काळजीपूर्वक ऐका.कॉलघेतल्यावर लगेच बीपचा आवाज ऐकू येतो. जर तुम्हाला हा आवाज ऐकू येत असेल तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे, असे समजावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe