Car Overheat : तुमची कार जास्त गरम होतेय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर..

Ahmednagarlive24 office
Published:

Car Overheat : जास्त वेळ कार चालवली तर ती खूप गरम होते. समजा तुमची कार जास्त वेळ न चालवता जास्त गरम होत असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर मोठा अनर्थ होऊ शकतो.

कार जास्त गरम होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमची कार दोघेही नेहमी सुरक्षित राहू शकता. कार गरम होण्याची काही कारणे आहेत, जाणून घेऊयात सविस्तर.

1. ही आहेत कारणे 

कारचे इंजिन जास्त गरम होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. यापैकी पहिले कारण म्हणजे उच्च तापमानात कार चालवणे. समजा कार अतिशय उष्ण हवामानात चालवली तर कारचे इंजिन सामान्य तापमानाच्या तुलनेत जास्त वेगाने गरम होते. दुसरे कारण म्हणजे गाडी जास्त वेळ चालवली तरी ती जास्त गरम होते.

2. कार गरम झाल्यावर काय करावे

जर तुमची कार जास्त गरम होत असेल तर सगळ्यात अगोदर कार सुरक्षित ठिकाणी थांबवा. त्यानंतर, सुमारे अर्धा तास इंजिन बंद करा.

3. काढू नका रेडिएटर कॅप 

कधीही चालू कारमधील रेडिएटर कॅप काढू नका. कारण त्याचे कामच इंजिन गार ठेवणे आहे. जर तुम्ही चालत्या कारमध्ये रेडिएटर कॅप काढली तर ती खूप गरम होते. तसेच त्यात खूप दाब येतो. त्यामुळे तुमच्या हात, तोंड, डोक्यायासह शरीराच्या अनेक भागांवर जळजळ होते. जर तुम्हाला कॅप काढायची असेल तर प्रथम काही वेळ कार बंद करून इंजिन थंड झाल्यावर उघडून तपासा.

4. कूलंट गळती

जर तुमच्या कारमध्ये कूलंट असेल तर कार जास्त गरम होत नाही. तसेच ते कोठून कूलंट गळत नाही ना त्यासाठी तुमच्या कारचे कूलंट तपासले पाहिजे. जेव्हा कूलंट गळती होते तेव्हा इंजिन जास्त गरम होते.

5. इतर प्रकारच्या गळतीची काळजी घ्या

कूलंटची गळती होत नसेल आणि कार जास्त गरम होत असेल तर कारमध्ये आणखी इतर प्रकारची गळती होऊ शकते. रेडिएटर किंवा इंजिनमधून गळती होत असेल तर गाडीचे बॉनेट उघडून पाहा. तसेच गाडीच्या इंजिनच्या खालच्या बाजूने तपासा. गळती झाली तर कार लवकरात लवकर एखाद्या चांगल्या मेकॅनिककडे घेऊन जा आणि तिची नीट तपासणी करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe