Aadhaar Card : आधारकार्डचे गैरप्रकार वाढत चालले असल्यामुळे आता आधार कार्डच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. परंतु, तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे ते कसे समजेल? जर तुम्हालाही यांसारखे प्रश्न पडले असतील तर बातमी तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही आता सोप्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे का ते तपासू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ते तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

असा पहा आधाराचा इतिहास
स्टेप 1
जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कुठे वापरले आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in वर जावे लागणार आहे.
स्टेप 2
- त्यांनतर ‘माय आधार’ या पर्यायावर क्लिक करा.
- ‘Aadhaar Authentication History’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
स्टेप 3
- तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल तो येथे टाका.
- त्यानंतर OTP सत्यापन या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.
स्टेप 4
- तुमच्या मोबाईल क्रमांकावर मिळालेला हा ओटीपी तुम्हाला टाकावा लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर एक टॅब उघडेल, त्यात तुम्हाला ज्या दिवशीचा इतिहास तपासायचा आहे ती तारीख टाकावी लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या दिवशी आणि कुठे वापरले आहे ते समजेल.
- तुम्हाला हे रेकॉर्ड डाउनलोड करता येईल.