ISRO Scientist Monthly Salary : भारताकडून चांद्रयान-३ गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाशात सोडण्यात आले आहे. इस्रोकडून चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
कोणतीही अवकाश मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय इस्रोचे शास्त्रज्ञ रात्र न दिवस कष्ट करत असतात. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि प्रमुख काम करत असतात. मात्र अनेकांना या सर्वांचा पगार किती आहे असा प्रश्न पडत असतो. आज तुम्हाला इस्रोमधील शास्त्रज्ञ, अभियंते आणि प्रमुख यांच्या पगाराबद्दल माहिती सांगणार आहोत.
इस्रोच्या नवीन शास्त्रज्ञाचा मूळ पगार
भारताची कोणतीही अवकाश मोहीम राबवायची असेल तर त्याचे सर्व काम इस्रोद्वारे केले जाते. इस्रोमध्ये नवीन एखादा उमेदवार भरती झाला तर त्याला त्याठिकाणी काम करण्यासाठी अनेक प्रकारची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
या नवीन उमेदवाराचा मूळ पगार 15,600 – 39,100 हजार प्रति महिना असतो. तसेच DA, घरभाडे भत्ता, आणि सेवानिवृत्ती भत्ता दिला जातो. ISRO कडून दरवर्षी अनेक विभागांमध्ये शास्त्रज्ञ/अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी पदे काढली जातात.
इस्रोच्या वैज्ञानिकांचा पूर्ण पगार
1- इस्रोमधील नामवंत शास्त्रज्ञांचा पगार 75,500-80,000 हजार रुपये आहे.
2- इस्रोमधील एका उत्कृष्ट शास्त्रज्ञाचा पगार 67,000-79,000 हजार रुपये आहे.
3- शास्त्रज्ञ/अभियंता- ISRO मध्ये H&G पगार 37,400- 67,000 हजार रुपये आहे.
4- ISRO मधील वैज्ञानिक/अभियंता-SG चा पगार 37,400- 67,000 हजार रुपये आहे.
5- ISRO मधील वैज्ञानिक/अभियंता-SF चा पगार 37,400- 67,000 हजार रुपये आहे.
6- इस्रो मधील वैज्ञानिक/अभियंता-SE&SD चा पगार 15,600- 39,100 हजार रुपये आहे.
7व्या वेतन आयोगानंतर इस्रो वैज्ञानिक वेतनश्रेणी-
इस्रोच्या कामगारांना केंद्र सरकारच्या ७व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. यामध्ये त्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि सेवानिवृत्त भत्ता देखील दिला जातो. ७व्या वेतन आयोगानुसार येथील कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ झाली आहे.
शास्त्रज्ञ/अभियंता- H&G च्या 7 व्या वेतन आयोगानंतर पगारात 10,000 हजारांची वाढ झाली आहे.
वैज्ञानिक/अभियंता-एसजी यांच्या 7व्या वेतन आयोगानंतर पगारात 8,900 हजारांची वाढ झाली आहे.
वैज्ञानिक/अभियंता-एसएफच्या 7व्या वेतन आयोगानंतर, पगारात 8,700 हजारांनी वाढ झाली आहे.
वैज्ञानिक/अभियंता-SE च्या 7 व्या वेतन आयोगानंतर पगारात 7,600 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
वैज्ञानिक/अभियंता-एसडी यांच्या 7व्या वेतन आयोगानंतर पगारात 6,600 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा पगार किती आहे?
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा पगार किती आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचा पगार दरमहा अडीच लाख रुपये आणि वार्षिक उत्पन्न सुमारे 1 कोटी आहे. इस्रोचे सहयोगी संचालक जॉन मॅथ्यू यांचा दरमहा पगार १ लाख ८३ हजार आहे म्हणजेच वार्षिक 22 ते 24 आहे.