अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- आजवर जे रस्ते दुर्लक्षित राहिले अशा दुर्लक्षित झालेल्या सर्वच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
वडगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. मारुतराव कांगणे होते. वडगाव येथे २५१५ मूलभूत सुविधा योजनेंतर्गत ४८ लक्ष रुपये निधीतून बस स्टँड ते पांडुरंग कांगणे वस्ती रस्ता,
खंडेराव सोनवणे वस्ती ते सोमनाथ कांगणे वस्ती रस्ता, भीमराज केदार शेती ते गणपत सोनवणे वस्ती रस्ता व शिवाजी सोनवणे शेती ते पांडुरंग केदार वस्ती रस्ता या रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.
काळे म्हणाले, सर्वच रस्त्यांचा विकास करण्याचा माझा मानस आहे. मात्र, रस्त्यांचे काम गुणवत्तापूर्ण होऊन हे रस्ते दीर्घकाळासाठी नागरिकांच्या उपयोगात आले पाहिजेत.
त्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे रस्ते पाइपलाइनसाठी खोदले जाणार नाही, याची काळजी घेऊन रस्त्याचे काम सुरु होण्यापूर्वीच पाइपलाइनचे काम पूर्ण करावे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम