अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- शहरातील काही परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिशय दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालना बाहेर गढूळ पाण्याची पूजा मांडून अनोखे आंदोलन केले.(amc news)
यावेळी नागरिकांना सुविधा देण्यास असमर्थ असलेल्या मनापा अधिकार्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या वारंवार सदर बाब मनपा आयुक्त शंकर गोरे व अभियंतांच्या निर्देशास आणून देखील अद्याप देखील समस्यां कायम असल्याने अखेर हे आंदोलन करण्यात आले.

दूषित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ केलेल्या या आंदोलनात तृतीयपंथी नागरिकांच्या हस्ते पूजा करून चिखलाचा नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. त्यानंतर दगडांचा प्रसाद वाटला. .
मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांनी आंदोलकांच्या भावना समजावून घेत उपाय योजना राबवण्याचे आश्वासन दिले. मात्र समाधान न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.
याच वेळी महापालिकेत आलेले आयुक्त शंकर गोरे यांनी मात्र कार्यालयात न येता बाहेरच्या बाहेर जाणे पसंत केल्याने आंदोलक अधिक चिडले.
यावेळी सुहास मुळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये नगर विकास राज्यमंत्री असून नसल्यासारखे आहेत, तर पालकमंत्र्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.
जनतेला सुविधा देऊ न शकणारी ही महानगरपालिका नसून महानरकपालिका आहे. अशा या अनाथ महानरकपालिकेला बरखास्त करा, अशी मागणी सुहासभाई मुळे यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम