अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने पसरणारा संसर्ग दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चाललाय.
मुख्यमंत्री म्हणाले …
- महिनाभराच्या आत आपण या परीस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो…
- आपण एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे.
- आपल्याला आता एकमुखी निर्णय घ्यावा लागेल.
- कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत.
- या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे.
- कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे.
- कठोर निर्णय घ्यावा लागेल.
- आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे.
- पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे.
- मध्यंतरीचा काळ बरा होता.
- सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे.
राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची चाचपणी :- कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे.त्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची चाचपणी महाविकास आघाडी सरकारकडून केली जातेय.या बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात :- राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू न करता काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत.आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी दोनच शब्दात आपली भूमिका मांडली आहे.
संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे :- राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे.निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही असं सांगतानाच आताच निर्णय घेतला तर आपण महिनाभरात कोरोनावर नियंत्रण मिळवू,असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय :- राज्यातील लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल,असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. तसेच, प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|