Maharashtra News:राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी जोरात सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
एका निनावी दुरूध्वनीद्वारे ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. एका व्यक्तीने फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस सतर्क झाले असून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.