अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- यंदा पावसाबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यंदाही मूबलक प्रमाणात पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता सोडून उत्पादनवाढीच्या अनुशंगाने पिकांचे गणित मांडावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे. शेतकरी हा शेतातील पेरण्या ह्या पावसाच्या अंदाजा वरच करत असतो.
हवामानातील अंदाज गेले काही वर्षापासून अचूक ठरत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेतातील कामांचे उपयोजना करण्यास होत आहे.
पावसाबाबत च्या अंदाजा बाबद अकोल्यातील तेल्हारा तालुका कृषी व्यावसायिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंजाब डख यांनी पावसाबाबतचा अंदाज व्यक्त केला असून यंदाही मूबलक प्रमाणात पाऊस असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.
या अंदाजाचा विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. पिक पेरणीपूर्वी पाऊस झाला म्हणजे तो पेरणीयोग्य पाऊस आसतो.
तर पेरणी दरम्यान 15 ते 30 मे च्या वेळी पाऊस झाला तर तो पेरणी केलेल्या पिकांच्या वाढीसाठी योग्य पाऊस ठरतो. यावर्षी पाऊस जरी चांगला होणार असला तरी शेतकऱ्यांनी मात्र योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी केल्यास फायद्याचे ठरणार आहे.