Maharashtra News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वी मशिदवरील भोंग्यांवरून मोठा वाद झाला होता.
आता तो काहीसा शांत झाला असला तरी यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा प्रयत्न दिल्लीतील बॉम्बे ट्रस्टच्या जामा मशीदने केला आहे.
यासाठी मोबाइल ॲप लाँच करण्यात आले असून त्यावरून नमाजची माहिती आणि लाइव्ह आजान ऐकण्यासह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.
बॉम्बे ट्रस्टच्या जामा मशीदने Al Islaah या नावाचे ॲप आणले आहे. याद्वारे यूजर्संना नमाजच्या वेळांची माहिती देण्यासोबतच मशीद मधील नमाजची लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्याची सुविधा मिळणार आहे.
मशीद ट्रस्टचे चेअरमन शोएब खातीब यांनी सांगितले की, नमाजासाठी लोकांना बोलावणे हे धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे.
या ॲपच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. सुप्रीम कोर्टाच्या लाउडस्पीकर गाइडलाइन्स केवळ अजानसाठी नसून सर्वांसाठी आहेत.
परंतु, एका पार्टीकडून राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. या उद्भवलेल्या वादानंतर आम्ही बैठकीत यावर तोडगा शोधून काढला आहे.
सर्वात आधी आम्ही एक रेडिओ फ्रिक्वेंसी घेण्याचा विचार केला. परंतु, त्यासाठी खूप परवानग्या लागत होत्या. त्यामुळे आम्ही हे ॲप आणले आहे.