Jandhan Account: देशातील नागरिकांना आर्थिकमदत देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. याचा फायदा देखील आतापर्यंत अनेक नागरिकांना मिळाला आहे. सरकारची अशीच एक योजना आहे ज्याच्या फायदा देशातील करोडो नागरिक घेत आहे ते म्हणेज प्रधानमंत्री जन धन योजना.
या योजनेअंतर्गत विविध बँकेत झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडले जाते. या योजनेमध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुक यासह अनेक प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिल्या जातात. जर तुमचे खाते उघडले नसेल किंवा उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा
जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही 10,000 रुपये काढू शकता. म्हणजेच या खात्यात 10,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की याआधी ओव्हरड्राफ्टची मर्यादा 5000 रुपये होती. मात्र सरकारने ती वाढवून 10,000 रुपये केली आहे.
नियम
या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे आहे. जेव्हा तुमचे जन धन खाते किमान 6 महिने जुने होईल, तेव्हाच तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकाल. जर ते 6 महिन्यांचे नसेल तर तुम्ही फक्त 2000 रुपये काढू शकाल.
अशा प्रकारे तुमचे खाते उघडा
तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत प्रधानमंत्री जन धन योजना खाते उघडू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खाजगी बँकेत तुमचे खाते उघडू शकता. दुसरीकडे, जर तुमचे बचत खाते उघडले असेल, तर तुम्ही ते जन धन खात्यात रूपांतरित करू शकता.
भारतातील कोणताही रहिवासी ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे तो जन धन खाते उघडू शकतो. देशातील सर्व बँकांमध्ये जन धन खाते उघडता येते. हे खाते बँकिंग, बचत, कर्ज, विमा, पेन्शन यासाठी वापरले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे MJDY (PMJDY) खाती शून्य शिल्लक वर उघडता येतात.
हे पण वाचा :- MPV Cars : कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ जबरदस्त कार ! खरेदीसाठी जमली गर्दी ; किंमत आहे 6 लाखांपेक्षा कमी