जावयाच्या ‘या’ निर्णयाचा रजनीकांत यांना धक्का; चाहतेही झाले नाराज

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27जानेवारी 2022 :- सुपरस्टार रजनीकांत यांच्या लेकीचा घटस्फोट झाल्यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धनुष-ऐश्वर्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी रजनीकांत यांची धडपड चालू आहे.

परंतु या घटस्फोटामागचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे समजत आहे. साऊथमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणारे धनुष आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाल्याने रजनीकांत सोबत चाहते देखील नाराज झाली आहेत.

रजनीकांत यांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला आहे. रजनीकांत यांचे जावई धनुषच्या वडिलांनी कौटुंबिक कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला आहे, असे स्पष्ट केले आहे.

धनुष आणि ऐश्वर्याने काही दिवसांपूर्वी म्हणजेच 17 जानेवारीला आपल्या सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. धनुष व ऐश्वर्या हे १८ वर्षानंतर वेगळे झाले आहेत.

या दोघांमध्ये सतत मतभेद होऊन भांडण होत असत. याआधीही त्या दोघांमध्ये अनेक टोकाचे मतभेद झाले आहेत. परंतु प्रत्येक वेळी रजनीकांत यांनी या परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.

रजनीकांत यांनी घटस्फोटाबाबतची माहिती अद्याप सोशल मीडिया वर बोलून दाखवली नाही. ते आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या फारच जवळ आहेत. परंतु याप्रकरणी चाहत्यांकडून नाराजगी व्यक्त करत यामागचे कारण शोधण्यावर धरपड चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe