Jeevan Anand Policy : देशातील सगळ्यात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन पॉलिसी आणत असते. गुंतवणूकदारांना एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला आयकर सवलतीचा लाभ देण्यात येत आहे.
यात आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळत आहे. एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव जीवन आनंद पॉलिसी आहे. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये दररोज 73 रुपये जमा केले तर तुम्हाला पूर्ण 10 लाख रुपये मिळणार आहे. काय आहे एलआयसीची शानदार पॉलिसी जाणून घ्या.
या योजनेत कोणाला करता येते गुंतवणूक
जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पॉलिसी मॅच्युरिटीसह खात्रीशीर परतावा देत असून गुंतवणूकदारांनाही बोनस मिळत आहे. परंतु हे लक्षात घ्या की हा बोनस 15 वर्षे सतत गुंतवणुकीवर मिळत आहे. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, या पॉलिसी अंतर्गत, नॉमिनीला त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य तो परतावा देण्यात येतो.
जाणून घ्या किमान पॉलिसी रक्कम
एलआयसी योजनेत किमान विमा रक्कम 1 लाख रुपये इतकी आहे. मात्र, LIC गुंतवणूकदाराच्या मृत्यूच्या बाबतीत 125% विमा रक्कम देत आहे. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांना या पॉलिसीमध्ये इतर अनेक फायदे मिळत आहेत. यात अपघाती मृत्यू, अपंगत्व, टर्म अॅश्युरन्स आणि गंभीर आजारांसाठी विमा यांचा समावेश आहे.
इतकेच नाही तर तुम्हाला परतावा कसा मिळवायचा आहे ते तुम्हाला निवडता येते. त्यामुळे, जर तुमची इच्छा असेल तर, तुम्ही एकरकमी रक्कम काढू शकता किंवा तुम्ही निश्चित मासिक परतावा घेऊ शकता.
मिळतो इतका परतावा
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये, जर 24 वर्षीय गुंतवणूकदाराने 5 लाख रुपयांचा पर्याय निवडला असेल तर त्याला प्रीमियम म्हणून वार्षिक 26,815 रुपये भरावे लागणार आहेत. हे 2281 रुपये मासिक किंवा 76 रुपये प्रतिदिन असून पुढील 21 वर्षात जमा होणारी रक्कम सुमारे 563705 रुपये असणार आहे. बोनसच्या रकमेसोबत, गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर सुमारे 10 लाख 33 हजार रुपये मिळणार आहेत.