Jio : देशात रिलायन्स जिओ, आयडिया वोडाफोन आणि एअरटेल या खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तर बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या चारही कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग आहे. या कंपन्या सतत टक्कर देण्यासाठी शानदार ऑफर असणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात.
असाच एक रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओने आणला आहे. ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे. या रिचार्ज प्लॅनची खासियत म्हणजे या रिचार्जमध्ये कुटुंबातील 4 सदस्यांना मिळणार मोफत कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा देण्यात येत आहे.
कंपनीचा 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचा हा फॅमिली प्लॅन असून ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह 75GB डेटा देण्यात येत आहे. इतकेच नाही तर तुम्हाला मोफत मेसेजिंग सुविधा देण्यात येत आहे.
समजा तुम्ही Jio चे ग्राहक असल्यास तर तुमच्यासाठी एक महिन्याची मोफत चाचणी देण्यात येत आहे. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला कोणताही रिचार्ज न करता एका महिन्यासाठी फॅमिली प्लॅनचा आनंद घेता येईल.
किती द्यावे लागणार पैसे
रिलायन्स जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन सदस्य जोडण्यात येतात. इतकेच नाही तर, आता प्रत्येक सदस्य जोडण्यासाठी 99 रुपये स्वतंत्रपणे भरावे लागणार आहेत. अशा प्रकारे तुमचा महिन्याचा रिचार्जचा खर्च सुमारे 696 रुपये इतका होईल.
त्याशिवाय तुम्हाला सुरक्षा ठेव म्हणून 500 रुपये भरावे लागणार आहेत. हे लक्षात ठेवा की सुरक्षा ठेव पहिल्या महिन्यासाठी असणार आहे. म्हणजे पहिल्या महिन्यात तुम्हाला 1196 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच कॉर्पोरेट कर्मचारी आणि इतर काहींसाठी सुरक्षा ठेव विनामूल्य ठेवली आहे. तर दुसऱ्या महिन्यापासून फॅमिली प्लॅन घेणार्या ग्राहकांना केवळ 696 रुपये भरावे लागणार आहेत.