Jio Offer : ग्राहकांना लागली लॉटरी! दररोज मिळणार 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि शानदार बक्षिसे

Published on -

Jio Offer : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. इतकेच नाही तर कंपनीच्या रिचार्ज प्लॅनची किंमत खूपच कमी असते.

रिलायन्स जिओ विविध मोबाईल वॉलेट आणि पेमेंट अॅप्सद्वारे रिचार्ज करत असणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळे फायदे देत आहे. समजा तुम्ही कंपनीचा नवीन वापरकर्ता किंवा विद्यमान वापरकर्ता असल्यास तर पहिल्या आणि तिसऱ्या रिचार्जवर विशेष रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकचा लाभ तुम्हाला मिळेल. परंतु हे लक्षात घ्या की या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 ऑक्टोबरपर्यंतच मिळेल. याचाच असा अर्थ आहे की आता तुमच्याकडे रिचार्ज करण्यासाठी जवळपास एक आठवडा शिल्लक आहे. जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती.

PhonePe ऑफर

समजा ग्राहकांनी PhonePe अॅपद्वारे रिचार्ज केल्यास ते नवीन वापरकर्ते असेल त्यांना 500 रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. इतकेच नाही तर विद्यमान Jio सदस्यांना पहिल्या आणि तिसऱ्या रिचार्जवर 400 रुपयांपर्यंत बक्षिसे मिळणार आहे.

पेटीएम रिचार्ज ऑफर

पेटीएमने रिचार्ज करत असणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना 10,000 कॅशबॅक पॉइंट्स आणि JIONEW कोडसह 300 रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळतील. तसेच विद्यमान वापरकर्त्यांना JIOFEST कोड लागू केला तर समान फायदे मिळतील.

Amazon Pay रिचार्ज ऑफर

नवीन वापरकर्त्यांना Amazon अॅपद्वारे रिचार्ज केला तर 50 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच विद्यमान वापरकर्त्यांना 250 रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड ऑफर केले जातात. त्याशिवाय Amazon Pay Later सेवेसह 25 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इतकेच नाही तर Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड ऑफरसह, नवीन आणि विद्यमान वापरकर्त्यांना 2% कॅशबॅक मिळू शकतो.

MobiKwik रिचार्ज ऑफर

समजा नवीन वापरकर्ते JIONEW कोड वापरत असेल तर त्यांना MobiKwik UPI द्वारे पेमेंट केले तर त्यांना 50 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळेल. त्याशिवाय JIOZIP कोडसह अॅपद्वारे पेमेंट केले तर 25 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच विद्यमान वापरकर्त्यांना JIO250 कोडसह रु. 250 सुपरकॅश देखील मिळेल.

Tata NEU रिचार्ज ऑफर

टाटा न्यू अॅप किंवा वेबसाइटद्वारे रिचार्ज करण्याच्या बाबतीत, नवीन वापरकर्त्यांना 75 पर्यंत NeuCoins मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News