Jio Prepaid Plan : जर तुम्ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने काही स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत.
ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा,अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळत आहेत. तसेच तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Jio TV आणि Jio Cinema अॅक्सेस करता येईल. जाणून घेऊयात प्लॅन आणि किंमत.
रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
कंपनीचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असून कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 GB डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय कंपनी या प्लॅनमध्ये 7 GB अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. इतकेच नाही तर पात्र युजर्सना प्लॅनसह अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळत आहे. हा प्लॅन देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग प्रदान करतो. यात दररोज १०० मोफत एसएमएस देणार्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema चा देखील मोफत प्रवेश मिळेल.
रिलायन्स जिओचा 749 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्लॅनच्या ग्राहकांना ऑफरमध्ये 14 GB अतिरिक्त डेटा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच हा देखील प्लॅन पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करत आहे. यात दररोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा लाभही मिळत आहे. 299 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे हा प्लॅन Jio TV आणि Jio Cinema वर मोफत प्रवेश देत असून कंपनीच्या या शानदार प्लॅनची वैधता ९० दिवसांची आहे.
रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओ या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता देत असून यात दररोज 2.5 GB डेटासोबत 21 GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. शिवाय इतर प्लॅनप्रमाणे, हे पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर करते. प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळत असून या प्लॅनच्या सदस्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Jio TV आणि Jio Cinema अॅक्सेस करता येईल.