Jio Recharge : जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन रिचार्ज प्लॅन बाजारात सादर करत असते. तुम्ही देखील जिओचे ग्राहक असाल आणि स्वतःसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. कारण आम्ही तुम्हाला जिओच्या काही भन्नाट रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षभरासाठी फ्री डेटा मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅन्सबद्दल संपूर्ण माहिती.
Jio 2545 Prepaid Plan
Jio 2545 प्रीपेड प्लॅन असाच एक आहे जो नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. कारण या एका प्लॅननंतर तुम्हाला दुसरे रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा संपूर्ण 336 दिवसांसाठी उपलब्ध आहे. यासोबतच यामध्ये डेटा सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. यामध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही दिली जाते.

Jio 2879 Prepaid Plan
Jio 2879 प्रीपेड प्लॅनची वैधता संपूर्ण वर्षासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्याही रिचार्जशिवाय 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा दिला जाईल. यासोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस दिले जातात. म्हणजेच एकूणच ही योजना सर्वच बाबतीत फिट असल्याचे सिद्ध होते. तुम्ही हा प्लान पेटीएम, फोनपे वरून खरेदी करू शकता.
Jio 2999 Prepaid Plan
Jio 2999 प्रीपेड प्लॅन देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. कारण यामध्येही तुम्हाला सर्व सुविधा मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. त्याची खासियत म्हणजे यात 365 दिवसांव्यतिरिक्त 23 दिवसांची वैधताही देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. म्हणजेच एकूणच ही योजना खूपच चांगली ठरणार आहे. विशेषत: अशा वापरकर्त्यांसाठी ज्यांना दरमहा रिचार्जचा त्रास टाळायचा आहे.
हे पण वाचा :- Viral News : ‘वरा’ने मुलीच्या वडिलांना विचारले असं काही.. सोशल मीडियावर झाला व्हायरल अन् आला असा ट्विस्ट..