Jio Recharge Plan : जिओकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट! मिळणार OTT सबस्क्रिप्शनसह मोफत सेटअप बॉक्स, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Published on -

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. दरम्यान असाच एक शानदार रिचार्ज प्लॅन कंपनीने आणला आहे. जो प्लॅन तुमच्या बजेटमध्ये येईल. यात तुम्हाला कंपनीकडून अनेक फायदे दिले जात आहेत.

रिलायन्स जिओकडून आपल्या ग्राहकांना आता मोठे गिफ्ट देण्यात येत आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा ब्रॉडबँड प्लॅन आहे. ज्याची किंमत 1197 रुपये आहे. जर या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात OTT सबस्क्रिप्शनसह मोफत सेटअप बॉक्स उपलब्ध दिला जात आहे.

प्लॅनद्वारे ऑफर करण्यात आलेला वेग 30mbps इतका आहे. ग्राहकांना 30mbps अपलोड तसेच डाउनलोड गती मिळू शकते. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा देण्यात येतो. अनलिमिटेड म्हणजे प्रत्येक महिन्याला 3.3TB हाय-स्पीड डेटा. तुमचा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग कमी होतो, तरीही इंटरनेट चालूच राहते. तुम्हाला या ऑफर अंतर्गत, एक विनामूल्य सेटअप बॉक्स देण्यात येईल. इतकेच नाही तर OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता दिली जाईल.

जाणून घ्या फायदे ?

अनेकजण Jio Fiber च्या मासिक प्रीपेड प्लॅन घेतात. परंतु आता कंपनीकडून तीन महिन्यांचा प्लॅन आणण्यात आला आहे, किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 1197 रुपये इतकी आहे. प्लॅनद्वारे ऑफर करण्यात आलेला वेग 30mbps आहे. ग्राहकांना यात 30mbps अपलोड तसेच डाउनलोड गती मिळेल. यात लँडलाईन कनेक्शनसह फ्री व्हॉईस कॉलिंग उपलब्ध असणार आहे.

Jio Fiber च्या 1197 रुपयांच्या प्लॅनमध्ये GST चा समावेश करण्यात येणार आहे, याचा अर्थ प्लॅनसाठी थोडे जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. मासिक प्लॅनच्या तुलनेत यात नवीन काहीही नाही. परंतु या प्लॅनचा तूम्हाला एक फायदा असा होणार आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला सतत रिचार्ज करावा लागणार नाही. तुम्ही तीन महिन्यांसाठी केवळ एकदाच पैसे देऊ शकता. या ऑफर अंतर्गत, एक विनामूल्य सेटअप बॉक्स देण्यात येईल तसेच OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता देखील देण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News