Jio Recharge plan : ग्राहकांना जिओने दिला मोठा धक्का! एकाच वेळी बंद केले 12 प्लॅन, आता मोजावे लागणार इतके पैसे

Published on -

Jio Recharge plan : रिलायन्स जिओने (Reliance Jio) नुकतीच 5G सेवा (5G services) सुरु केली आहे. परंतु, जिओने आपल्या ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे.

कारण जिओने (Jio) एकाच वेळी तब्बल 12 प्लॅन (Jio plan) बंद केले आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Jio ने हे 12 प्लॅन बंद केले आहेत

Reliance Jio ने Rs 151, Rs 555 आणि Rs 659 चे प्लॅन (Recharge plan) बंद केले आहेत. हे प्लॅन अॅड ऑन श्रेणीमध्ये होते म्हणजेच त्यामध्ये डेटा उपलब्ध होता. याशिवाय, 333 रुपये, रुपये 499, रुपये 583, रुपये 601, रुपये 783, रुपये 799, रुपये 1,066, रुपये 2,999 आणि रुपये 3,119 चे नियमित रिचार्ज प्लॅन देखील बंद करण्यात आले आहेत. या सर्व प्लॅनसह, वापरकर्त्यांना एका वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार सदस्यता मिळत होती.

जागतिक क्रिकेट स्पर्धा T20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे

Jio ने हे प्लॅन बंद करून मोठा धक्का दिला आहे, कारण 16 ऑक्टोबरपासून जागतिक क्रिकेट स्पर्धा T20 वर्ल्ड कप सुरू होत आहे, जो फक्त Disney + Hotstar वर येईल.
अशा स्थितीत पूर्वी जी सबस्क्रिप्शन मोफत मिळत होती, ती आता भरावी लागणार आहे. Jio कडे अजूनही अशा दोन योजना शिल्लक आहेत ,ज्यात Disney + Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे आणि हे प्लॅन रुपये 1,499 आणि 4,199 रुपये आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News