Jio Recharge Plan : फक्त एकदाच करा रिचार्ज! जिओच्या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल मोफत कॉलिंगसह डेटा

Published on -

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देते. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. त्यामुळे ग्राहक कंपनीकडे जास्त आकर्षित होतात. कंपनीने आताही असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे.

रिलायन्स जिओच्या या शानदार प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवस मोफत कॉल आणि 912 जीबी डेटाचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच रिचार्ज करावा लागणार आहे. कारण या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे.

रिलायन्स जिओचा 2,545 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओच्या या 2,545 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना 336 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच यामध्ये दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 504 जीबी डेटाचा लाभ मिळू शकतो.

इतकेच नाही तर तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधाही मिळेल. याशिवाय, तुम्हाला कंपनीच्या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. आनंदाची बाब म्हणजे तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ घेऊ शकता.

रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना 365 दिवसांपर्यंत वैधता मिळत असून यात तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा मिळेल. इतकेच नाही तर इंटरनेट वापरण्यासाठी 21 GB अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. यामध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100SMS चा लाभ मिळत आहे.

जाणून घ्या इतर फायदे

  • जर तुम्ही AJIO मधून खरेदी केली तर तुम्हाला 200 रुपयांची सवलत मिळेल.
  • शिवाय Netmeds वर 20% आणि Swiggy वर 100 रुपयांची सूट मिळत आहे.
  • इतकेच नाही तर 149 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर, तुम्हाला मोफत मॅकडोनाल्ड जेवण देखील मिळेल.
  • फ्लाइट बुकिंगसाठी यात्रा अॅपवर 1500 रुपयांची शानदार सवलत मिळेल.
  • तुम्हाला हॉटेल बुकिंगसाठी 4000 रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्ही नेटमेड्सवर 999 रुपयांची औषधे ऑर्डर केली तर
  • त्यावर तुम्हाला 20% सवलत देखील मिळू शकते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe