Jio Recharge Plan : देशभरात रिलायन्स जिओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. कंपनीदेखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. रिलायन्स जिओ सतत एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाला टक्कर देते.
सध्या OTT प्लॅन पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता कंपनी देखील OTT फायदे असणारे प्लॅन घेऊन येत असते. कंपनीने आपला असाच एक रिचार्ज प्लॅन आणला आहे. जो ग्राहकांना प्राइम व्हिडिओ 365 दिवसांसाठी मोफत पाहता येईल.

इतकेच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये Netflix, Disney Plus Hotstar, SonyLIV Plan, ZEE5 Plan आणि ZEE5-SoniLIV सबस्क्रिप्शन मिळेल. यात ग्राहकांना दररोज 2GB डेटा आणि मोफत कॉल्स मिळतील. जाणून घेऊयात कंपनीच्या प्लॅनबद्दल.
दररोज किती मिळेल डाटा?
किमतीचा विचार केला तर रिलायन्स जिओच्या या नवीन प्लॅनची किंमत 3,227 रुपये इतकी आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून यात ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. समजा तुम्ही दैनंदिन डेटा मर्यादा संपवली तरी काळजी करू नका.
आता तुम्ही 64 Kbps वेगाने अनलिमिटेड इंटरनेट वापरणे सुरू ठेवू शकता. इतकेच नाही तर रिलायन्स जिओच्या नवीन प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा देखील समावेश आहे. या प्लॅनच्या OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर Jio च्या 3,227 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.
तसेच प्लॅनमध्ये Jio TV, JioCinema आणि JioCloud वर प्रवेशचा समावेश आहे. इतकेच नाही तर, या प्लॅनच्या ग्राहकांना अनलिमिटेड ट्रू 5G डेटासाठी देखील पात्र आहेत. समजा जर Jio कडे 5G कव्हरेज असेल आणि त्यांच्याकडे 5G फोन असेल, तर त्यांना कोणत्याही खर्चाशिवाय अनलिमिटेड 5G डेटा घेता येईल.