Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीचे असे दोन रिचार्ज प्लॅन आहेत ज्यांची किंमत खूप कमी आहे. यात तुम्हाला दररोज अनलिमिटेड 5G डेटा आणि मोफत कॉल्ससह अनेक फायदे मिळतील.
दरम्यान, रिलायन्स जिओचे दोन पोस्टपेड प्लॅन आहेत ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा खूप कमी आहे. या प्लॅनची किंमत 299 रुपये आणि 399 रुपये आहे. जाणून घेऊयात रिलायन्स जिओच्या या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.

जिओचा 299 रुपयांचा प्लॅन
किमतीचा विचार केला तर रिलायन्स जिओच्या या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. कंपनीचा हा प्लॅन 30GB मासिक डेटासह येतो. हा एकरकमी डेटा असून बल्क डेटाचा फायदा होतो की तुमि इच्छित असल्यास, आपण संपूर्ण वैधता दरम्यान वापरू शकता किंवा आपण संपूर्ण डेटाचा एकाच दिवसात वापर करू शकता.
30GB डेटा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना प्रत्येक अतिरिक्त GB डेटासाठी 10 रुपये द्यावे लागणार आहेत. परंतु ही योजना ट्रूली अनलिमिटेड 5G डेटा ऑफरसह येते, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही Jio 5G कव्हरेज असणाऱ्या क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला हवा तेवढा 5G डेटा वापरता येईल. प्लॅनमध्ये, ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. ग्राहकांला अतिरिक्त फायदे म्हणून JioTV, JioCinema आणि JioCloud मध्ये प्रवेश मिळेल.
जिओचा 399 रुपयांचा प्लॅन
जिओचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन 75GB मासिक डेटासह येईल. हा एकरकमी डेटा प्लॅन असून यात 75GB डेटा कोटा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना प्रति जीबी 10 रुपये द्यावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त सिम कार्ड दिले आहेत.
प्रत्येक सिमसाठी वापरकर्त्यांना आवश्यक असेल तर त्यांना 99 रुपये द्यावे लागतील. हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह येतो. प्रत्येक अतिरिक्त सिम कार्डवर 5GB डेटा मिळेल. वापरकर्त्यांना या प्लॅनसह अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. तसेच अतिरिक्त फायदे म्हणून JioTV, JioCinema आणि JioCloud मध्ये प्रवेश मिळतो.