Jio Recharge Plan : जिओची मोठी ऑफर! मोफत पाहता येणार वर्ल्डकपचे सामने, जाणून घ्या डिटेल्स

Published on -

Jio Recharge Plan : जर तुम्ही देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. असेच प्लॅन आता कंपनीने आणले आहेत.

ज्यांची किंमत खूपच कमी आहे, परंतु त्यात शानदार फायदे मिळत आहेत. या प्लॅनमुळे तुम्हाला वर्ल्डकपचे सामने मोफत पाहता येणार आहेत. तुम्हाला Disney Hotstar Mobile चे 3 महिन्यांचे सदस्यत्व मिळेल. त्यामुळे आजच या प्लॅनचा रिचार्ज करून फायद्यांचा लाभ घ्या. जाणून घ्या डिटेल्स.

रिलायन्स जिओचा 328 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 328 रुपयांच्या या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ घेता येईल. इतकेच नाही तर तुम्हाला डिस्ने हॉटस्टारची ३ महिन्यांसाठी मेंबरशिपही दिली जाईल. जेणेकरून तुम्हाला क्रिकेटचे सामने आरामात पाहता येऊ शकतात.

रिलायन्स जिओचा 388 रुपयांचा प्लॅन

याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. ज्यात तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि 3 महिन्यांसाठी Disney Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. या ऑप्शनमध्ये तुम्हाला 808 रुपयांचा प्लॅनदेखील मिळत आहे, ज्यात तुम्हाला दररोज 2GB डेटा आणि 84 दिवसांची वैधता मिळेल.

रिलायन्स जिओचा 758 रुपयांचा प्लॅन

जिओने आणखी एक प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 758 रुपये इतकी आहे. या शानदार प्लॅनमध्ये, तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळेल, जो क्रिकेटप्रेमी आणि इतर मनोरंजनासाठी पुरेसा आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney Hotstar Mobile चे 3 महिन्यांचे सदस्यत्व देखील मिळेल.

रिलायन्स जिओचे दोन प्रीमियम प्लॅन

जिओ कंपनीचे दोन प्रीमियम प्लॅन आहेत. यातील पहिला 598 रुपयांचा प्लॅन आहे जो 84 दिवसांसाठी येतो. तर दुसरा 598 रुपयांचा प्लॅन आणि 3178 रुपयांचा प्लॅन आहे. ज्यात तुम्हाला हाय स्पीड डेटासह अनेक भन्नाट फायदे मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe