Jio Cheapest Plan : रिलायन्स जिओ ही नामांकित टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या ग्राहकांसाठी जिओ सतत भन्नाट प्लॅन आणत असते. त्याशिवाय या कंपनीचे ग्राहकही खूप आहेत.
सध्या फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे. त्यामुळे जिओने ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत 222 रुपये इतकी आहे. नुकताच जिओने हा प्लॅन लाँच केला आहे.
222 रुपयांचा प्लॅन
Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे, या प्लॅनची किंमत 222 रुपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना 4G चा 50GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. हे लक्षात ठेवा की कंपनीने हा प्लॅन डेटा अॅड-ऑन प्लॅन म्हणून लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची असणार आहे.
50GB हाय स्पीड डेटाचा लाभ घ्या
Jio चा हा प्लॅन 1 महिन्यासाठी वैध असणार आहे. यामध्ये ग्राहकांना 50GB हाय स्पीड डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो. हा प्लॅन दैनंदिन डेटा सुविधेसह नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार हा डेटा वापरू शकता. या प्लॅनमुळे, तुम्हाला सध्याचा दैनिक डेटा संपल्यानंतरही इंटरनेटचा लाभ मिळतो
मिळतील हे फायदे
प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये अतिरिक्त डेटा फायदे मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही आता कोणत्याही अडथळ्याशिवाय फुटबॉल विश्वचषकाचा आनंद घेऊ शकाल. परंतु, यामध्ये एसएमएस किंवा कॉलिंग चा फायदा मिळत नाही. त्याशिवाय हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे आधीपासूनच एक प्लॅन उपलब्ध असणे गरजेचे आहे.