Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केली होती. जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहजे.
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने जितेंद्र आव्हाड यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर जामिनासाठी आव्हाड यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
न्यायाधीश बी एस पाल यांनी अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तपासात सहकार्य करणे, तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीस जाणे, साक्षीदारांशी संपर्क करु नये, तपासात बाधा आणू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्यासह उच्च न्यायालयाने १२ जणांना जामीन मंजूर केला आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी विवियामा मॉलमध्ये प्रेसखाला मारहाण केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमे वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.
जितेंद्रची बाजू मांडणारे वकील प्रशांत कदम यांनी त्यांच्या अटकेविरोधात न्यायालयात युक्तिवाद केला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांवर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याचे कदम म्हणाले.
ते म्हणाले की नोंदवलेले गुन्हे हेतुपुरस्सर होते आणि कलम 7 वाढवता येत नाही, कारण अशी तरतूद 1932 मध्ये करण्यात आली होती, जी महाराष्ट्रात लागू नाही. यानंतर कदम यांनीही ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.